Thursday, February 27, 2020

भाषा दिवस

माय मराठी चे कौतुक किती करु 
त्या मातीचे गुणगान किती करु  l

 
अरे ,या सह्याद्रीच्या विळख्याने 
सगळ काही दिल , 
त्यात एक भाषा 
जिनं मला बोलन शिकवल ! 

अभिमान स्वाभिमान आणि सम्मान 
सगळ आमच मराठी, 
सांगा गाड्यांनो 
याचे अजुन गुणगान कीती करू ! 

या मातीचा गर्वच वेगळा त्या 
वीरांचा मान किती करू.
सांग रे सवंगड्या , 
या भाषेचा सन्मान किती करु ! 

             ( भाषा दिनी समर्पित 🙏) 



Wednesday, February 26, 2020

निष्पाप बालपण

वेळ येतो वेळ जातो 
त्यासोबत चालतो आपण, 
त्या क्षणांना उजाळा द्यायला 
राहते आठवण राखण.

वेळेचा नसतो भान 

जेव्हा भेटतो मित्र छान, 
आठवुन सर्व गोष्टी 
पुन्हा होतो आपण लहान.

शाळेची येताच आठवण 

आठवते डब्याचे झाकण, 
पण वेळ गेल्यावर समजते 
तेच होते खरे जीवन.

कॉलेज मध्ये आम्ही 

करायचो खूप गंमत, 
मित्रांची होती संगत 
म्हणून जीवन होते रंगत.

माझ्या गावच वर्णन न्यार 

तेथील भरीव आठवडी बाजार, 
आमच्या चिंचेचा तो पार
अजूनही देतो हाकार.

माझे आदर्श आई बाबा 

ज्यानी शिकवली मला संस्कृती, 
करून त्यांची क्रुती 
करणार मी स्वप्नपूर्ती.

आता होत आहे मोठा 

काळ आहे खोटा , 
पण आठवतो तो ओटा 
जिथे होतो मे छोटा.

त्या निष्पाप जगातून 

आलोय पाप घ्यायला, 
त्याच भोळेपणाच्या जगात 
पुन्हा नाही का येत जायला ? 

एवढेच विचारतोय देबा 

समजून घे माझे भाष्य, 
का पुन्हा नाही बालपण 
इतकेच मजेत नैराश्य.